
सावंतवाडी : तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भात निरीक्षक नेमण्यात आलेले होते. या सर्व निरीक्षकांना व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांना तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महत्त्वाच्या सूचना व येणाऱ्या निवडणुकीची प्रशासकीय माहिती विशिष्ट सूचना देण्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर सावंतवाडी मध्ये आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन करण्यात आले. हे शिबिर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडले. या शिबिराचे उद्घाटन श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इरशाद शेख, जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, काँग्रेस नेते ॲड. दिलीप नार्वेकर,शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र मापसेकर यांनी केले.
यावेळी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष बासिप पडवेकर, शिवा गावडे, माया चिटणीस, ओबीसी शहराध्यक्ष संतोष मडगावकर, सुमेधा सावंत, विठ्ठल केदार व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. या शिबिराला वेंगुर्ला तालुका काँग्रेस अध्यक्ष विधाता सावंत हे मार्गदर्शक म्हणून लाभले. या शिबिराचे सूत्रसंचालन रवींद्र मापसेकर यांनी केले. आभार राघवेंद्र नार्वेकर यांनी मानले.










