
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे मत्सव्यवसाय व बंदर विभाग मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री नितेश राणे यांचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याच काम श्री.राणे करतील असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी व्यक्त केला.
मंत्री राणे यांना पुष्पगुच्छ देऊन सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्याहस्ते शिवसेना पक्षाच्यावतीने स्वागत केले. तसेच तेरेखोल नदीतील गाळ काढण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा केमीस्ट अॅण्ड ड्रग्ज असोसिएशनच्या वतीनेही विनायक दळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी, उपाध्यक्ष विनायक दळवी, सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, खरेदीविक्री संघाचे उपाध्यक्ष राजन रेडकर, मळगांव शिवसेना उपविभागप्रमुख संदेश सोनुर्लेकर, नेतर्डे शाखाप्रमुख जगदेव गवस, सुरेश गवस व कार्यकर्ते उपस्थित होते.