भजन साहित्य वितरणात घोळ?

या प्रक्रियेतील अधिका-यांची चौकशी करा | अरुळे माजी सरपंच उज्ज्वल नारकर यांची मागणी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 12, 2023 17:53 PM
views 1004  views

वैभववाडी : जिल्हा परिषद मार्फत वाटप करण्यात आलेल्या भजन साहीत्यात घोळ करण्यात आला आहे. असा आरोप अरूळेचे माजी सरपंच तथा बोर्चादेवी प्रासदिक भजन मंडळाचे अध्यक्ष उज्वल नारकर यांनी केला आहे. प्रशासनानाने ही  वितरण प्रकिया फेसबुक लाईव्ह करुनही तेथील अधिकाऱ्यांनी गोंधळ घातला आहे. अशा अधिकाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नारकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन जिल्हयातील भजन मडळांना भजन साहीत्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.या भजनी मंडळाची निवड प्रकिया लकी ड्रॉ पध्दतीने करण्यात आली. या प्रकियेमध्ये पारदर्शकता यावी याकरीता लकी ड्रॉ प्रकियेचे फेसबुक लाईव्ह करण्यात आले होते.यामध्ये लोरे जिल्हा परिषद मतदारसंघातील पाच गावांची निवड करण्यात आली होती. त्यातील बोर्चादेवी रामेश्वर प्रासादीक भजन मंडळाच्या नावाची चिठ्ठीचे वाचन करताना आम्ही पाहीले.

परंतु प्रत्यक्षात ही यादी ज्यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाकडुन आमच्यापर्यत पोहोचली त्या यादीत या भजन मंडळाचे नाव नसल्याचे दिसुन येत आहे.उलट त्याच गावातील गणेश प्रासादीक भजन मंडळाचे नाव यादीत आले आहे. फेसबुक लाईव्हवर कुठेही या मंडळाचे नाव आले नव्हते मग यादीत नाव कसे आले याची चौकशी करण्यात यावी. हा घोळ ज्या अधिकाऱ्यांनी घातला आहे त्या अधिकाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी .भजनाचे साहीत्य बोर्चादेवी भजन मंडळाला मिळावे अन्यथा भजन मंडळाच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नारकर यांनी दिला आहे.या आशयाचे निवेदन श्री.नारकर यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी,आमदार नितेश राणे,गटविकास अधिकारी आणि भजन संघटना सिंधुदुर्ग यांना दिले आहे.