कबुलायतदार गांवकर प्रश्न सुटणार..? | दीपक केसरकरांचं महत्वाचं भाष्य

Edited by:
Published on: June 25, 2023 19:43 PM
views 89  views

सावंतवाडी : मतदारसंघातील दोन काम प्रलंबित होती. त्यातील एक कबुलायतदार गांवकर प्रश्न, ज्याला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली होती. त्या प्रश्नाला आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती उठवत मार्ग मोकळा केला आहे. लवकरच मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी हा प्रश्न सादर केला जाईल. त्यामुळे आंबोली आणि गेळे या दोन गावांचा लोकांचा प्रश्न सुटेल तसेच सावंतवाडीच्या मल्टिस्पेशालिटीचा प्रश्न देखील शासनदरबारी असून तो देखील प्रश्न येत्या आठवड्यात मार्गी लागेल असं मत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. 

तर सावंतवाडीतील एसटी डेपोच काम थांबलेल होत. पीपीटी तत्वावर हे स्थानक व्हावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट डेपोपैकी हे स्थानक व्हावं यासाठीचा प्रस्ताव सादर करणार आहे. तिलारीच अॅम्युझमेंट पार्क, वेंगुर्ला तालुक्यातील स्कुबा डायव्हिंग व सबमरीनं यांसह तिन्ही तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून मार्गी लागतील. 

दरम्यान, जिल्ह्यातील पहिल्या फाईव्हस्टार हॉटेल्सचा शुभारंभ येत्या दोन महिन्यांत होईल. आडाळी एमआयडीसीत देखील लवकरच नवे प्रकल्प येतील. तर सावंतवाडी अर्बन बँकेला रिझर्व्ह बँकेकडून निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत अगोदर कल्पना असती तर उपाययोजना करता आली असती. या आधी सुद्धा पाच कोटी रुपयांच भागभांडवल बँकेला दिलेल आहे. ३५ सेक्शनच्या नोटीसनुसार अस्तित्वातील सभासदांकडून भागभांडवल वाढवाव लागत. त्यासाठी काही काळ जाईल, वेळेत कळलं असतं तर भागभांडवल उपलब्ध करून दिल असतं. परंतु, कुणीही काळजी करायची आवश्यकता नाही. लवकरच आरबीआय व सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांच मार्गदर्शन घेऊन हा प्रश्न मार्गी लावला जाईल अस मत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे आदी उपस्थित होते.