
सावंतवाडी : कारिवडे भंडारी टेंब येथील आनंदी लक्ष्मण तळवणेकर (वय १०४) यांचे गुरूवारी वृद्धापकाळाने निधन झाले. धार्मिक आणि अध्यात्मिक विचारसरणी असलेल्या आनंदी तळवणेकर यांनी अनेकवेळा गरीब व गरजूंना मदत केली होती. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंतचा चालता बोलता इतिहास त्यांच्याकडे होता. या दरम्यानच्या अनेक घटनांच्या त्या साक्षीदार होत्या. चार वर्षांपूर्वी त्यांचा शतक महोत्सवी वाढदिवस त्यांच्या कुटुंबीयांनी साजरा केला होता.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांच्या त्या मातोश्री तर सौ मिलन तळवणेकर यांच्या त्या सासू होत. कारिवडे माजी सरपंचा सौ अपर्णा तळवणेकर आणि सौ गायत्री तळवणेकर यांच्या त्या आजी सासू आणि लक्ष्मण उर्फ आबा तळवणेकर, कारीवडे भाजपा शक्ती केंद्रप्रमुख आनंद तळवणेकर, लाकूड व्यावसायिक गजानन तळवणेकर यांच्या त्या आजी होत.