पत्रकार संजय बाणे यांना पितृशोक !

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 12, 2024 06:18 AM
views 158  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील आशिये गावचे रहिवासी मोहन बाळकृष्ण बाणे वय ६८ यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. कणकवली उपजिल्हा रुग्णालय उपचार सुरू असताना १२ जानेवारी रोजी मध्यरात्री २.३० वाजता प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात पत्नी, बहीण, मुलागा, सून, मुलगी, जावई, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. रत्नागिरी टाइम्सचे पत्रकार आणि  पत्रकार संघाचे सदस्य संजय बाणे यांचे ते वडील होत.