'गांजा' बाळगणे - विक्री प्रकरणी सशर्त जामिन मंजुर..!

Edited by: विनायक गावस
Published on: October 07, 2023 13:31 PM
views 247  views

सावंतवाडी : स्थानिक गुन्हा अन्वेषण ओरोस यांनी सोमवारी कोलगाव- काजरकोंड येथे गांजा पार्टीवर छापा टाकून दोघाजणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी सोमवारी रात्री कुडाळ रेल्वेस्टेशन येथे बनावट गिऱ्हाईक पाठवून गांजा प्रकरणी पुरवठा करणारा राहूल मारुती राठोड (१९ सध्या रा. कुडाळ मुळ बेळगाव) याला. कुडाळ रेल्वे स्टेशनवर येथे जेरबंद करण्यात आले.

त्यांच्याकडून तलवार, दुचाकी तसेच गांजा जप्त करण्यात आला. त्याअनुषंगाने आरोपी विरुध्द गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (N.D.P.S.Act 1985) चे कलम ८ (क) (२७) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ ( Arms Act 1959) चे कलम (४) (२५) प्रमाणे कारवाई करण्यात आलेली होती. त्यांना सावंतवाडी येथील न्यायालयात दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ रोजी हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. त्यांना पुन्हा सावंतवाडी येथील न्यायालयात दिनांक ०५ ऑक्टोबर २०२३ रोजी हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. आरोपीतर्फे अॅड. परशुराम चव्हाण यांनी युक्तीवाद केला.

आरोपीतर्फे अॅड. परशुराम चव्हाण यांनी न्यायालयात जामिन अर्ज दाखल करुन त्यावर केलेला युक्तीवाद ग्राह्य मानुन न्यायालयाने आरोपी यास रक्कम रुपये पंधरा हजारचा सशर्त जामिन मंजूर करण्यात आला. आरोपी तर्फे ॲड परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले.