वैभववाडीतील स्टाॅलच्या जागांवर पक्कं बांधकाम सुरू

महसूल, नगरपंचायतीच अभय ?
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 12, 2023 15:13 PM
views 368  views

वैभववाडी : शहरात नगरपंचायतीने कारवाई केल्यानंतर पुन्हा नव्याने स्टाॅल उभारण्यात येत आहेत.आज तर या स्टॉलच्या जागांवर चक्क पक्कं बांधकाम करून स्टाॅल उभारले जात आहेत.मात्र याकडे नगरपंचायत ,महसूल विभागाने दुर्लक्ष केले असल्याचे दिसत आहे.

   शहरातील विकासकांमाकरिता  मार्च महिन्यात वाभवे -वैभववाडी नगरपंचायतीने स्टाॅल हटाव मोहिम राबविली होती. या मोहीमेत शहरातील सर्व स्टॉल हटविण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा हे स्टॉल उभारण्यात येत आहेत. आज तर शहरातील मोक्याच्या ठिकाणी पक्कं बांधकाम करून स्टाॅल उभे करण्याच काम सुरू आहे. मात्र या बांधकामांकडे महसूल, नगरपंचायत विभागाने दुर्लक्ष केले आहे.