
सावंतवाडी : पतंजली योग समिती सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित केलेल्या लठ्ठपणा असणार्यांसाठी विशेष योग शिबिराचा सावंतवाडी येथे सांगता समारंभ संपन्न झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सावंतवाडी शहरात योग प्रसाराचे कार्य खूप मोठ्या वेगाने चालू आहे. सावंतवाडी येथे लठ्ठपणा शिबिरामध्ये पतंजलि योगपिठ हरिद्वार अंतर्गत मोटापा शिबिराकरिताचा विशेष योगाभ्यास घेण्यात आला . 21 दिवसांचे हे संपुर्ण योगशिबिर यशस्वी पणे संपन्न झाले. अनेक योगसाधकांचे या शिबिरामध्ये 2 ते 5 किलो पर्यंत वजन कमी झाले. या शिबिराचा सांगता समारंभ कार्यक्रम योगवर्गात घेण्यात आला. त्यावेळी सावंतवाडी संस्थानचे लखमराजे भोसले यांच्या हस्ते पतंजली योगसमिती सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी शेखर बांदेकर यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी कळसुलकर इंग्लिश स्कूल चे चेअरमन शैलेश पै , भारत स्वाभिमान माजी जिल्हा प्रभारी महेश भाट, तहसिल प्रभारी दत्तात्रय निखार्गे विकास गोवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरामध्ये पतंजली योग समिती सिंधुदुर्ग चे जिल्हाप्रभारी शेखर बांदेकर यांनी सतत 21 दिवस शिबीर घेतल्यामुळे सर्व शिबिरार्थींनी आभार व्यक्त केले. शिबीर कळसुलकर इंग्लिश स्कूल सभागृह सावंतवाडी येथे घेण्यात आले, स्कूलच्या संचालकांनी शिबिराकरिता जागा, स्टेज, साऊंड सिस्टिम मोफत उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. सुमारे 70 योग साधकांची दररोज उपस्थिती या शिबिरास लाभली . शिबिर संपले तरी सावंतवाडी येथे दररोज योगवर्ग नियमितपणे चालू आहे. या योगवर्गाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले .