
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा योगमय बनवला जाईल, त्या दृष्टीने सावंतवाडी तालुक्यात सहयोग शिक्षक प्रशिक्षण महिन्याभराच्या कालावधीत देण्यात आले आहे. निश्चितपणे येत्या काळात जिल्हा योगमय बनेल असा निर्धार यावेळी सहयोग शिक्षकांनी घेतलेल्या प्रशिक्षणात केला.
सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारंभ थाटात करण्यात आला. सावंतवाडी येथील वैश्य भवन मध्ये 10 डिसेंबर ते 20 जानेवारी या कालावधीत एक महिना पतांजली योग समिती सिंधुदुर्ग यांच्यावतीने शंभर दिवसांचे सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराचा समारोप मंगळवारी झाला. यावेळी प्रमुख पाहुणे कोकण मराठी साहित्य परिषदचे तालुकाध्यक्ष ॲड संतोष सावंत व प्रकाश रेडकर, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पतंजली योग समितीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष शेखर बांदेकर, भारत स्वाभिमान चे प्रभारी जिल्हाध्यक्ष व पतंजली योग समितीचे महेश भाट, सावंतवाडी मधील भारत स्वाभिमान माजी जिल्हा प्रभारी महेश भाट, सावंतवाडी तहसिल प्रभारी लक्ष्मण पावसकर, अनिल मेस्त्री, रामनाथ सावंत आणि चंद्रशेखर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शेखर बांदेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सहयोगी प्रशिक्षण शिक्षकांनी सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून अँड. सावंत म्हणाले, पतंजली योग समितीने योगाचे महत्त्व लक्षात घेऊन सावंतवाडी तालुक्यातील व्यक्तींसाठी योग प्रशिक्षण घेतले. निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्हा लवकरच योगमय होईल, सहयोगी शिक्षकांनी घेतलेले हे व्रत अविरत सुरू ठेवावे असेही ते म्हणाले.
यावेळी श्री बांदेकर म्हणाले, पतंजली योग समिती च्या माध्यमातून योग प्रशिक्षण शिबिर घेतले जात होते. त्याचे बी रुजले आहे. आज सावंतवाडीतील सहयोगी शिक्षक प्रशिक्षण शिबिराला जो उस्फुर्त सहभाग दिसून आला त्यावरून निश्चितपणे येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा योगमय होईल. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल लातये यांनी केले आणि आभार प्रदर्शन सौ चैताली गवस यांनी केले. या शिबिरामध्ये पतंजलि योग समिती सिंधुदुर्गचे जिल्हाप्रभारी शेखर बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिबिरार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
राज्यप्रभारी बापू पाडळकर, राज्यप्रभारी चंद्रशेखर खापणे, शेखर बांदेकर, डॉ. तुळशीराम रावराणे, प्रकाश कोचरेकर, वैद्य सुविनय दामले, दिपश्री खाडिलकर, रमाताई जोग आणि प्रणाली मराठे अशा सर्व योगशिक्षकांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा स्वरूपात शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. अभय सावंत, ऐश्वर्या सावंत, भरत धुरी, चैताली गवस, शुभ्रा चांदोस्कर, धैर्यशील शिर्के, दिगंबर पावसकर, रेखा जगताप, लक्ष्मण राणे, मेघा धुरी, मृणाली राणे, श्री नागराज, नम्रता राणे, नारायण राणे, निशिगंधा सावंत, प्रकाश आंबिटकर, प्रतीक्षा देसाई, राजेंद्र राणे, रश्मी माणगावकर,रसिक भोगण, सज्जन नाईक, संध्या सौदागर, संदीप बांदेकर, नारायण सावंत, श्रद्धा सावंत, स्नेहल कडोलकर, सुधा बांदेकर, सुपर्णा भाईप, वैशाली घाडी , विकास भोगण अशा 30 जणांनी प्रशिक्षण घेतले.