मुंबई - गोवा हायवेचं रखडलेलं चौपदरीकरणाचं काम पूर्ण करा

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने वेधलं लक्ष
Edited by: विनायक गावस
Published on: August 09, 2023 19:39 PM
views 95  views

सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून अपघाताची शक्यता लक्षात घेता हे खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत तसेच रखडलेलं चौपदरीकरणाचं काम पुर्ण करण्यात यावं अशी मागणी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रशासनाकडे करण्यात आली. प्रांताधिकारी कार्यालयाचे नायब तहसिलदार संतोष बांदेकर यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले.

यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सचिव मयुर चराठकर, राज्य पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, अभिमन्यू लोंढे, जिल्हा संघाचे खजिनदार अँड.संतोष सावंत, डिजीटल मिडीया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, उपाध्यक्ष दीपक गावकर, विजय देसाई, उमेश सावंत, नरेंद्र देशपांडे,शैलेश मयेकर,भुवन नाईक,नितेश देसाई,प्रसाद माधव,मंगल नाईक आदी उपस्थित होते.