गगनबावडा घाटाचे काम 1 जूनपर्यंत पूर्ण करा

नितेश राणेंच्या अधिकाऱ्यांना सूचना
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 22, 2024 14:46 PM
views 193  views

कणकवली : जानवली येथे सातत्याने होणारे अपघात महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे होत आहे. या अपघातात निरपराधांचे बळी जात आहेत. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीने योग्यत्या उपाययोजना कराव्यात. वाहनांचा स्पीड नियंत्रित राहावा यासाठी गतिरोधक आणि माहिती फलक  ठीक ठिकाणी लावावेत अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी अधिकारी व ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना दिल्या.

मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे शिल्लक असलेले काम तातडीने पूर्ण करा. अपघात होता नये, लोकांचे जीव जाता नये,यासाठी योग्य त्या उपाययोजना करा. वर्दळीच्या ठिकाणी वाहनाची गती नियंत्रित राहील अशा पद्धतीने महामार्गावर उपयोजना केल्या जाव्यात अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी महामार्ग प्राधिकरण चे अधिकारी त्याचप्रमाणे ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांनी महामार्ग वरील समस्या, होणारे अपघात आणि अपूर्ण असलेली कामे याविषयी बैठक घेतली या बैठकीला महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अतुल शिवनिवार, के.के.सी. बील्डकॉन  कंपनीचे श्री. गुप्ता, गगनबावडा घटाचे कंत्राटदार श्री वेल्हाळ, भाजपचे पदाधिकारी बाळ जठार, दिलीप तळेकर, भालचंद्र साटे,खारेपटन सरपंच प्राची इस्वलाकर,संकेत शेट्ये.तळरे सरपंच,शिवसेनेचे बबन शिंदे,दामू सावंत,यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी वैभववाडी गगनबावडा घाटातचे काम एक जून पर्यंत पूर्ण करा. कोणतीच कारण  नको अशा सूचना गगनबावडा घाटाचे काम करत असलेल्या कंत्राटदाराला दिल्या.