
सावंतवाडी : सकल मराठा समाज सावंतवाडी तालुक्याच्यावतीने दहावी बारावीतील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून दहावी-बारावीनंतर पुढे काय? कोणकोणत्या क्षेत्रात संध्या उपलब्ध आहेत याबाबतचे मार्गदर्शन तसेच यूपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षेचे परीक्षांचे मार्गदर्शन प्रत्येक महिन्याच्या रविवारी ठेवण्यात येणार आहे. यासाठी आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी ८४८४८२७९९३ या व्हाट्सअप नंबरवर आपले नाव, गाव व इयत्ता लिहून संदेश टाकावा असे आवाहन सकल मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष सिताराम गावडे यांनी केले आहे.
नुकत्याच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या आहेत आता पुढे काय असा प्रश्न प्रत्येक पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मनात असतो कोणकोणत्या क्षेत्रात सध्या उपलब्ध असतात त्यासाठी काय केले पाहिजे. याबाबतचे अचूक मार्गदर्शन असणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा पालक आपली मते विद्यार्थ्यांवर लादतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बरोबर पालकांचेही नुकसान होते हे नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनात नक्की काय आ? हे त्याला काय बनायचे आहे? त्यासाठी तो सक्षम आहे का? याबाबतची सर्व चाचणी करून त्या विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे त्यासाठी विद्यार्थ्याबरोबर पालकांनी या उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येकी वीस मुलांची बॅच निवडण्यात येणार आहे व या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील तज्ञ शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत, पहिल्या सेमिनारला पालकांनी विद्यार्थ्याबरोबर उपस्थित राहणे गरजेचे आहे.