
कणकवली : माध्यमिक विद्यालय नाटळ प्रशालेत तिमिरातूनी तेजाकडे या कार्यक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. आजचे युग हे विज्ञान तंत्रज्ञानाचे युग आहे. कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचे झाल्यास विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते .आजची परिस्थिती पाहिली तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल हा चांगला लागतो. कोकण बोर्ड महाराष्ट्रात अव्वल असते. पण शासकीय नोकरी व स्पर्धा परीक्षांचा विचार केला तर कोकणातील विद्यार्थी हे मागे पडलेले दिसतात.याचे प्रमुख कारण म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन नसणे, तसेच मुंबई, पुणे या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन घेणे हे सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना परवडणारे नसते या सर्व गोष्टीचा विचार करून मराठा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य मुंबई व कोकण विभाग , कनेडी पंचक्रोशी समूह,कोकण विकास कृती समिती यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन माध्यमिक विद्यालय नाटळ येथे करण्यात आले. यामध्ये प्रमुख मार्गदर्शक सत्यवान यशवंत रेडकर कनिष्ठ अनुवाद अधिकारी सीमा शुल्क विभाग मुंबई भारत सरकार हे होते.
ग्रामीण भागातील परिस्थितीचा विचार करून स्थानिक विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा ,स्पर्धा परीक्षांमध्ये UPSC अंतर्गत कोणकोणत्या शासकीय खात्यात नोकरी मिळवता येते. तसे त्यासाठी कोण कोणती शैक्षणिक पात्रता असली पाहिजे आपली वयोमर्यादा किती असली पाहिजे.याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. केंद्र शासनाच्या नोकऱ्यांमध्ये असणाऱ्या सेवा, सुविधा व राज्य शासनाच्या नोकऱ्यांमध्ये असणाऱ्या सेवा, सुविधा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.आजची वास्तविक शिक्षण पद्धती शिकता शिकता स्पर्धा परीक्षा व आपले ध्येय समोर ठेवून अभ्यास करणे गरजेचे आहे. MPSC अंतर्गत कोणकोणत्या शासकीय भरत्या असतात. याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले या भरती प्रक्रियेसाठी आपल्याकडे कोणती शैक्षणिक पात्रता असली पाहिजे व वयोमर्यादा किती असली पाहिजे याचेही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सरळ सेवा भरती कोणकोणत्या पदासाठी असते व त्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता असली पाहिजे याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
अभ्यास कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे क्रमिक पाठ्यपुस्तके,सीबीएससी क्रमिक पुस्तके,त्याचबरोबर गणित, मराठी ,इंग्रजी बुद्धिमत्ता विषयांमधील ज्ञान सामान्य ज्ञान यामध्ये स्थिर ज्ञान व काळानुसार बदलणारे ज्ञान याविषयी टिप्पणी कशी करावी.याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शन शिबिरास मराठा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य मुंबई व कोकण विभाग, कनेडी पंचक्रोशी समूह कोकण विकास कृती समिती चे पदाधिकारी श्री. आशिष सावंत हे उपस्थित होते .या मार्गदर्शनानंतर इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु.रिया गावकर व श्री.टार्पे यांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.दयानंद गावकर यांनी केले.तर आभार प्रदर्शन श्री.दिनेश गावित यांनी केले.या कार्यक्रमास प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रणिता तेली, सहाय्यक शिक्षक श्री. दिनेश गावीत, श्री. सुरेश कोकणी, श्री. दयानंद गावकर, श्रीम. स्नेहल तांबे प्रशालेतील विद्यार्थी, माजी विद्यार्थी उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना असे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाल्याबद्दल संस्था अध्यक्ष भालचंद्र सावंत, सेक्रेटरी निलेश सावंत सर्व संस्था पदाधिकारी तसेच शालेय समिती चेअरमन नितीन सावंत यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले.