मळगाव गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध : अर्चना घारे परब

नूतन ग्राम सचिवालयाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा उत्साहात
Edited by: विनायक गांवस
Published on: February 20, 2023 16:59 PM
views 240  views

सावंतवाडी : मळगाव गावच्या नूतन ग्राम सचिवालयाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा शिवजयंतीचे औचित्य साधून अर्चना घारे परब यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. मळगाव गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कायम कटीबद्ध असल्याचा शब्द मळगाववासियांना त्यांनी उद्घाटनाच्या प्रसंगी दिला. ग्राम विकासाचे काम करत असताना पक्षीय हेवेदावे दूर सारून सर्वांनी एकत्र येऊन सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सर्वसमावेशक, जनतेला अपेक्षित असा विकास साधा, असे आवाहनही त्यांनी केले.


यावेळी व्यासपीठावर मळगाव सरपंच सौ स्नेहल जामदार, सावंतवाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक साहेब, भाजप अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, दर्शना बाबर देसाई, माजी सभापती राजेंद्र परब, सावंतवाडी ग्राहक सोसायटी अध्यक्ष प्रमोद गावडे, मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, मळगाव प्रभारी ग्रामविकास अधिकारी गोसावी, उपस्थित होते. कणकवली देवगड वैभववाडीचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.


यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी उपस्थित होते. पंचायत समिती माजी सदस्य रुपेश राऊळ यांनी या कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार अनिकेत तटकरे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी या कार्यक्रमास आपल्या व्यस्त शेड्युलमुळे फोनवरून शुभेच्छा दिल्या.


सर्व आजी-माजी सरपंच उपसरपंच, सर्व सदस्य, गावातील डॉक्टर, गावठी वैद्य, दशावतार कलाकार तसेच ज्यांनी ज्यांनी मळगाव गावासाठी योगदान दिले, अशा सर्व लोकांचा सत्कार करण्यात आला. बचत गट सीआरपी, महिला सदस्य, अंगणवाडी सेविका,यांनी ओवाळून मान्यवरांचे स्वागत केले. तसेच राष्ट्रवादी चे गाव कमिटी अध्यक्ष टिळक सावंत, राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते तसेच भिल्लवाडी ग्रुपचे अध्यक्ष पांडुरंग राऊळ तसेच त्यांचे सहकारी व सर्व ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. 


लोकसहभाग वर्गणीतून ज्यांनी या कार्यक्रमास हातभार लावला त्या सर्व लोकांचे मळगाव सरपंच स्नेहल जामदार यांनी आभार मानले. अंगणवाडी सेविका, बचत गट, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम सचिवालय समिती पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका विविध पक्षांचे कार्यकर्ते, मळगावचे तमाम ग्रामस्थ, ज्ञात-अज्ञात व्यक्ती या सर्वांनी हा सोहळा संपन्न पडण्यास विशेष मेहनत घेतली.