कौतुकास्पद... भेडशी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सेलीनाला केली 35 हजारांची मदत
Edited by:
Published on: April 21, 2024 07:20 AM
views 324  views

संदीप देसाई | दोडामार्ग : एखाद्या चांगल्या उद्देशाने जर एखादी चांगली संकल्पना मोहीम पुढे आली तर तितक्याच ताकदीने त्या संकल्पनेला समाजातून दाद मिळते हे आपण अनेकदा पाहिलंय. अगदी अशीच संकल्पना आणि माणुसकी जपणारी मोहीम न्यू इंग्लिश स्कूल भेडशीच्या माजी विद्यार्थी वॉट्सप ग्रुप मधील सदस्यांनी जपली आहे. याच प्रशालेत कॉलेजमध्ये शिकत असलेल्या १६ वर्षीय सेलिनाला कॅन्सर सारख्या असाध्य रोगान ग्रासल. मात्र परिस्थितीशी दोन करून तिच्यावर उपचार करण्यासाठी तिच्या कुटुंबीयांचे हात तोकडे पडत होते. त्या संघर्ष करणाऱ्या कुटुंबीयांचे हात बळकट करून सेकिनाला जीवदान देण्याच्या मोहिमेत खारीचा वाटा उचलण्याचा निर्धार भेटशील हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी केला. अन् याच माध्यमांतून जमलेली ३५ हजार १५० इतकी आर्थिक मदत जमा करून समजासमोर एक नवा आदर्श ठेवला.* 

न्यू इंग्लिश स्कूल भेडशी ग्रुपच्या सदस्यांचे आणि त्यांनी दाखवलेल्या या माणुसकीचं कौतुक होत आहे. दोडामार्ग कोनाळ येथील सेलिनावर शासकीय योजनेतून कॅन्सर वर ऑपरेशन तर झालं. मात्र त्यांनतर तिच्यावर दोन वेळा केमोथेरपी होणे आवश्यक होते. त्याकरिता एक वेळचा खर्च सुमारे ५० हजार होता. ही संकल्पना कोनाळ गावचे माजी सरपंच व भेडशी हायस्कूलचे माजी विद्यार्थी पराशर सावंत यांनी गृपवर मांडली. त्यावर सर्वांनीच लागलीच सकारात्मक प्रतिसाद दीला. आपण सवेंदनशील माणसे आहोत. आपण आपल्या कुटुंबाशी जस बांधील असतो तसच या समाजाचं सुद्धा देणं लागतो या भावनेनं कॅन्सर सारख्या असाध्य रोगाशी  झुंज देणाऱ्या सेलिनाच्या मदतीसाठी पुढाकार घेत मदतीचं संकलन सुरू केलं. 

रामचंद्र घुगे अमोल सावंत कृष्णा जंगले शशिकांत दळवी एकनाथ गवत सेजल मसुरकर सेल्फो कंपनी प्रमोद गवस दीपक जाधव अब्बास मुजावर ओम क्लिनिक लॅब ममता केसरकर इंडिया व चैतन्य प्रबोधनी बीडची चंद्रकांत नाईक डॉक्टर दीप्ती करमळकर रघुनाथ दळवी गंगाराम करवत विठ्ठल गवस यतीन सावंत नावेलकर स्मिता शेटकर आयुक्त लक्ष्मी गवस रवींद्र सातार्डेकर सत्यवान दळवी मंदार शेटवे, वासुदेव शेट्टी शेट ये महेश सावंत गो ऍट्रोनिक्स विठ्ठल गवस नितीन सावंत राजेश ठाकूर आशिष गावडे योगेश शेटे नीलम देसाई अजय परब उदय सावंत नंदकुमार निर्मल नंदकुमार नाईक राजेश पवार वीरेंद्र पडवळ विठ्ठल गवस शबाना खान संदेश सावंत सिद्धार्थ जाधव सय्यद निशा सावंत तुकाराम चिरमुरे वैदही पाल राजेश गवस आधी पन्नास जणांनी मिळून तब्बल 34 हजार पन्नास रुपयांची आर्थिक मदत संकलित केली वेळच्या स्कूलचे माजी विद्यार्थी व पुन्हा गावचे माजी उपसरपंच पराशर सावंत यांनीही मदत केली ना तिच्या कुटुंबीयांकडे नुकतीच सुपूर्त केली सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या विशेष उपक्रमाचे व ही संकल्पना राबविण्यात न्यू इंग्लिश स्कूल भेडशी व्हाट्सअप ग्रुपचे विशेष कौतुक होत आहे.