देवगड निपाणी मार्ग ते वाघेरी रस्त्याच्या नुतनीकरणाचा शुभारंभ !

Edited by: भरत केसरकर
Published on: March 09, 2024 07:14 AM
views 315  views

कणकवली : देवगड निपाणी मार्ग ते वाघेरी गावातील वाघेरी जोडरस्ता ग्रामा. १०३, १ कि.मी.रस्ता डांबरीकरण, नूतनीकरणाचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

       वाघेरी गावातून जाणारा हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला होता. अनेक वर्षे या रस्त्यासाठी ग्रामस्थांसह वाहतूकदाराची मागणी होती. फक्त निवडणूक जवळ आली की राज्यकर्ते आश्वासन देवून पुढे पाच वर्षे डोळेझाक करायचे पण यावेळी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) फोंडाघाट युवा विभाग प्रमुख सिद्धेश राणे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि ग्रामपंचायत वाघेरीच्या सहकार्याने वाघेरी जोड रस्त्यासाठी बजेट अंतर्गत ३० लक्ष, पूरनिधी व खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये विकास निधीतून रस्त्यासाठी एकूण ४० लाख रुपये निधी मंजूर झाला. याबद्दल गावातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. 

        या डांबरीकरण नूतनीकरण उद्घाटन समारंभाला वाघेरी मठखुर्द सरपंच सौ.अनुजा राणे, उपसरपंच सौ.स्नेहल नेवगे, माजी सरपंच तुकाराम गुरव, ग्रामपंचायत सदस्य सौ. निधी राणे, विकास सोसायटी संचालक विश्राम राणे, शाखाप्रमुख दत्तात्रय राणे,  मंगेश नेवगे, मुरलीधर राणे, अनंत राणे, मुरारी राणे, प्रकाश मोंडकर, सुहास ठुकरुल, सानिध्य राणे, सिद्धेश मोंडकर, वैभव तावडे, सुरेश राणे, गणेश राणे, विक्रम ठुकरुल, अभिषेक कदम, अनंत कदम, नितीन राणे, दत्तात्रय राणे, राजेश कदम, दिनेश पेडणेकर, सौ. प्रणाली नागप, सौ. रुपाली नागप, शिवानी वाघेरकर, दिव्या पेडणेकर आदी ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.