आ. वैभव नाईक यांनी परब कुटूंबीयांची घेतली भेट

केली आर्थिक मदत
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 03, 2023 19:08 PM
views 1001  views

मालवण : कातवड येथील रवींद्र परब यांच्या घरास दोन दिवसांपूर्वी शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी आज परब कुटूंबीयांची भेट घेत नुकसानीची माहिती घेत आर्थिक मदत केली. 

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबी जोगी, मंदार केणी, मंदार ओरसकर, सरपंच सिया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.