
सिंधुदुर्ग : गंगापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रशांत बंब यांनी दिनांक २९ नोव्हेंबर २०२३ रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राष्ट्रनिर्माणाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांबद्दल पुरेशा माहितीच्या अभावी त्यांच्या शिक्षकांप्रती असलेल्या वैयक्तिक भावनेतून नियमानुसार मिळणाऱ्या ४% वाढीव डी ए शिक्षकांना मिळू नये अशा आशयाचे पत्र मा. मुख्यमंत्री, मा. उप मुखमंत्री व मा. शिक्षण मंत्री यांना लेखी दिलेले आहे.
त्यामुळे राज्यातील लाखो शिक्षक व शिक्षक कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या गेल्या असून अद्यापही मिडीयावर शिक्षकांबद्दल अजूनही अपशब्द बोलत आहेत. मा. आमदार बंब यांनी अर्थहीन अपूर्ण माहितीच्या आधारे केलेल्या आरोपाचे व त्यांना प्रशासकीय नियमाची माहिती नसल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. याउलट आज शिक्षक करत असलेले काम व त्यांची विद्यार्थ्यांप्रती, समाजाप्रती असलेली तळमळीनची त्यांना जाणीव नाही. शासनाकडून वेळेवर अनुदान मिळत नाही, वेतनेतर अनुदान मिळत नाही त्यावेळेस वेळ प्रसंगी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून शिक्षक शाळा चालवताना दिसतात.शाळेमध्ये देशाप्रती, राज्याप्रती देशप्रेम,राष्ट्रप्रेम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचे काम करतात. व विद्यार्थ्याना विविध स्वरुपात मार्गदर्शनात शिक्षण देवून देशाला, राज्याला एक आदर्श नागरिक, डॉक्टर, इंजिनियर,वकील व राष्ट्रपती,पंतप्रधान,मुख्यमंत्री,मंत्री,आमदार,खासदार बनण्यासाठी नितीमुल्यांची सांगड घालून एक सक्षम नागरिक निर्माण करण्याचे पवित्र काम या समाजात शिक्षक करत असतात.सरकार व शासनाने राज्यातील सर्व शिक्षकांना सतत ऑनलाईन कामकाज देवून २४ तास शिक्षक शासानासाठी व सरकारसाठी उपलब्ध करून दिला आहे.
त्यामानाने आमदार प्रशांत बंब हे आपल्या मतदार संघात कधीच ऑफलाईन व ऑनलाईन उपलब्ध नसतात त्यामुळे त्यांची आमदारकीच रद्द करण्यात यावी अशी मागणी शिक्षक परिषद मा.विधानसभा व मा.विधान परिषद अध्यक्ष यांच्याकडे करणार आहे,असा टोलाही शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्या वतीने लगवण्यात आला आहे.मा. विधानसभा/विधान परिषद अध्यक्ष यांनी अश्या समाजात शिक्षकांप्रती वाचाळवीर आमदारावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आता राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी केली आहे.










