
कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी ठाकरे गट शिवसेना कणकवली शहराच्या वतीने कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिरात आ.वैभव नाईक व पत्नी स्नेहा नाईक यांच्या हस्ते महारुद्र करण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक सुशांत नाईक, पत्नी मयुरी नाईक,युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, नगरसेवक कन्हैया पारकर, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, वागदे माजी सरपंच रुपेश आमडोसकर,उपशहर प्रमुख सोहम वाळके ,आदी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.