आ. नितेश राणेंनी दिली एपीएमसी मार्केटला भेट...!

आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 26, 2024 14:03 PM
views 88  views

मुंबई : आमदार नितेश राणे यांनी आज मुंबई येथील एपीएमसी मार्केटला भेट देऊन आंबा उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली. एपीएमसी मार्केटचे प्रमुख पानसरे व त्यांच्या प्रतिनिधी समवेत यावेळी सविस्तर चर्चा केली. सकारात्मक झालेल्या चर्चेत आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. त्यामुळे एपीएमसी मार्केटला आमदार नितेश राणे यांनी दिलेली ही भेट आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरणार आहे.