आ. नितेश राणे यांच्या प्रयत्नातून नवीन कुर्ली स्वतंत्र ग्रामपंचायत मंजुरी..!

कुर्ली ग्राम विकास मंडळ व ग्रामस्थांनी मानले आभार
Edited by:
Published on: August 12, 2023 20:24 PM
views 138  views

कणकवली : २८ जुलै २०२३ रोजी नवीन कुर्ली ग्राम विकास मंडळाच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच आमदार नितेश राणे यांच्या समवेत ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांची विधान भवनामध्ये नवीन कुर्ली साठी स्वतंत्र ग्रामपंचायत मंजुरी मिळण्याबाबत भेट घेतली.

त्या भेटीमध्ये ग्रामविकासमंत्रि महाजन यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून येत्या पंधरा दिवसाच्या आत नवीन कुर्ली गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर करून देतो असे आश्वासित केले. आणि त्याप्रमाणे सदर भेटीनंतर आमदार नितेश राणे यांनी सदर प्रकरणात विशेष लक्ष घालून पाठपुरावा केला. व आम्हाला तेराव्या दिवशी ग्रामपंचायत मंजुरीचा आदेश जाहीर केला.

त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान एकनाथजी शिंदे तसेच ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे आणि मनोज रावराणे यांचे नवीन कुर्ली ग्राम विकास मंडळ व नवीन कुर्ली ग्रामस्थ यांच्यावतीने अध्यक्ष राजेंद्र कोलते उपाध्यक्ष सुरज तावडे सचिव धीरज हुंबे यांनी जाहीर आभार मानले.