आ. म्हात्रे यांची महात्मा गांधी विद्यामंदिरला सदिच्छा भेट..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 13, 2023 11:46 AM
views 76  views

देवगड : कोकण शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार माननीय श्री. म्हात्रे सर यांनी महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार,देवगड.प्रशालेला सदिच्छा भेट दिली.या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.नंदन घोगळे सर यांनी तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या वतीने आणि सर्व शिक्षकांच्या वतीने शिक्षक आमदार माननीय श्री.म्हात्रे सर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊ सत्कार केला.

शिक्षक आमदार श्री.म्हात्रे सर यांनी या वेळी शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की शिक्षकांची जुनी पेन्शन नवीन तुकड्यांना व मान्यता शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी सतत प्रयत्न करत आहे.आणि आज माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री.चौगुले साहेब यांच्याशी आज विस्तृतपणे चर्चा केली.आणि बरेचसे प्रश्न मार्गी लावले. शिक्षकांची वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी वेळेवर पगार मेडिकल बिल आणि इतर समस्या बाबत शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा केली.यावेळी श्री.घोगळे सर यांनी शिक्षक आमदार म्हात्रे यांच्या बाबतीत गौरव उद्गार काढले.यावेळी शाळेच्या भौतिक सुविधांसाठी पत्र देण्यात आले. शाळेच्या भौतिक सुविधांसाठी आपण सर्वतोपरी मदत करणार आहे.असे सांगितले यापूर्वी शाळेला आमदार फंडातून एक कॉम्प्युटर आणि प्रिंटर देण्यात आलेला आहे.असे ते म्हणाले.

   यावेळी त्यांच्याबरोबर शिल्लक जिल्हा अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.तर्फेसर सचिव श्री. कुसगावकर सर. श्री अत्तार सर तळेबाजार हायस्कूल चे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि देवगड तालुक्यातील अनेक शाळातील शिक्षक उपस्थित होते.