आ. शेखर निकमांच्या हस्ते देवरुख परिसरातील विविध कामांचं उद्या भूमिपूजन

Edited by:
Published on: February 26, 2025 19:25 PM
views 170  views

देवरुख : उद्या २७ फेब्रुवारीला देवरुख परिसरातील विविध कामांचे भूमिपूजन व उदघाटन संगमेश्वर चिपळूणचे विद्यमान आमदार शेखर निकम यांच्या हस्ते दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडणार आहे.  या सर्व कार्यक्रमांना स्थानिक पदाधिकारी आणि मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. 

देवरुख परिसरातील पुढील विकास कामांचे कामांचे भूमिपूजन - उदघाटन करण्यात येणार आहे.

▪️कोल्हेवाडी सभागृह बांधणे - भूमीपूजन,हसमवाडी रस्ता भूमीपूजन

▪️वरची आळी शाळेजवळ नदीवरील पूल भूमिपूजन 

▪️देवरुख नं. ४ शाळेजवळ गटार बांधणे भूमीपूजन

▪️अपना बाजार, स्टँडजवळ गटार बांधणे भूमीपूजन

▪️स्टेट बँक रोड गटार बांधणे भूमीपूजन

▪️देवरुख खालची आळी येथे खेळाचे,मैदान भूमीपूजन, 

▪️पठारवाडी सभागृह बांधणे भूमीपूजन, 

▪️पर्शरामवाडी विहीर पाखाडी बांधणे,संरक्षण भिंत बांधणे भूमीपूजन,कांजिवरा मदरसा लादीकाम, भूमीपूजन

▪️देवरुख शाळा क्र. २ भूमीपूजन

▪️देवरुख जामा मशीद पत्रा रोड,

▪️कंपाऊंड वॉल, पाखाडी भूमीपूजन व उद्घाटन.