
देवगड : देवगड तालुक्यातील हिंदळे येथे आमदार नितेश राणे यांनी हिंदळे ग्रामपंचायतमध्ये गावातील विविध समस्या आणि विकासकामांबाबत ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच येथील विविध विकास कामांची भूमिपूजने आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडली. यावेळी प्रकाश राणे, भाई पारकर, सावी लोके, भाई नरे, गोविंद सावंत यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
आ. नितेश राणे यांनी यावेळी प्रजिमा क्र. १४ पासून हिंदळे काळभैरव मंदिर बाणाची प्र.रा.मा. क्र. ४ ला मिळणारा मार्ग ग्रा.मा. क्र. ३२२ किमी ०/० ते १/० मध्ये खडीकरण डांबरीकरण. (ता. देवगड – रु. २० लाख), प्र.जि.मा. क्र. १४ पासून हिंदळे सडा, मुणगे सडा, भंडारवाडी, लब्देवाडी, मुणगे मंदिर ते प्र.रा.मा. क्र. ४ ला मिळणारा मार्ग ग्रा.मा. क्र. ३२४ किमी ०/० ते ४/७०० मध्ये मजबुतीकरण व संरक्षण भिंत बांधणे. (ता. देवगड – रु. २० लाख),हिंदळे तिन पिंपळ ते चिंबे घर रस्ता खडीकरण डांबरीकरण. (रु. ७ लाख) करणे या कामांचे भूमिपूजन केले.