जिल्हाधिकारी कार्यालय आता कात टाकणार...!

कार्यालयीन कामकाज गतिमान होण्यास मदत होणार
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 12, 2024 11:58 AM
views 247  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे कार्यालय असणारे सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मूळ बिल्डिंगच्या नूतनीकरणाच्या कामासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तब्बल 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याने अत्याधुनिक पद्धतीने ही इमारत बनवण्यात येणार असल्याचे समजत आहे. 

बरीच वर्ष जिल्हाधिकारी कार्यालयातील या इमारतीना झाली आहेत. त्यामुळे  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मागणीनुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय बिल्डिंग नूतनीकरनासाठी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्वात जास्त निधी उपलब्ध करून दिला असून, या कामाच्या पाठपुराव्यासाठी कणकवली कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी विशेष मेहनत घेतली होती. स्वतः बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या कामाला मंजुरी दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालय आता कात टाकणार आहे. कार्यालयीन कामकाज गतिमान आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये  देखील उत्साह आणि आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.