जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची सचिन वालावलकर यांनी घेतली भेट

Edited by:
Published on: September 10, 2024 06:23 AM
views 254  views

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर व कोचरा सरपंच योगेश तेली यांनी ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील काही प्रलंबित विषयांवर जिल्हाधिकारी पाटील यांचे लक्ष वेधले.