प्रकृती अस्वस्थामुळे जिल्हाधिकारी रुग्णालयात दाखल

Edited by:
Published on: November 06, 2023 15:42 PM
views 491  views

सिंधुदुर्ग : प्रकृती अस्वस्था मुळे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. आज सोमवारी जिल्हाधिकारी किशोर तावडे कार्यालयात हजर होऊन त्यांनी ऑडिओ कॉन्फरन्स केली त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालय दाखल केले. किशोर तावडे यांच्यावर डॉक्टर श्याम पाटील डॉक्टर आकेरकर व इतर डॉक्टर यांच्या मार्फत उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते.