कुडाळात सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन

Edited by:
Published on: January 31, 2025 19:47 PM
views 12  views

सिंधुदुर्ग : पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग यांच्या मार्फत संत राऊळ महाराज महाविद्यालय,  कुडाळ येथे  आज गुरूवारी  सकाळी ६ वाजता सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली. या शिबिराचे उदघाटन  लायन्स क्लब कुडाळचे अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर आणि पतंजली योग समिती सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी शेखर बांदेकर यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी तुळशीराम रावराणे, सामाजिक कार्यकर्ते काका कुडाळकर,  सोशल मीडिया तहसिल प्रभारी सावंतवाडी लक्ष्मण पावसकर, पतंजलि योग समिती तहसिल प्रभारी कणकवली प्रकाश कोचरेकर,  प्रोफेसर प्रशांत केरवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

योग ही काळाची गरज आहे आणि त्यामुळे संपूर्ण कुडाळ मधील जनतेने या योगशिबिराचा लाभ घेऊन जास्तीत जास्त  योगशिक्षक कुडाळ मध्ये व्हावेत असे  उदघाटक श्री बांदेकर यांनी सांगितले. दीप प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाल्यानंतर  जिल्हाप्रभारी  शेखर बांदेकर यांनी योगाभ्यास घेतला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल कडोलकर यांनी केले.

या शिबिरास कुडाळ मधील योगाभ्यास प्रेमींनी, तसेच आसपासच्या गावातील नागरिकांनी देखील सहभाग घेतला. संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळचे व्यवस्थापक यांनी या शिबिरासाठी लागणारे सभागृह,  स्टेज, साउंड सिस्टीम आणि जागा मोफत उपलब्ध करून दिली आहे. आभार प्रदर्शन अनिल मेस्त्री यांनी केले.