वेंगुर्ल्यात नारळी पौर्णिमा उत्साहात | शेकडो नागरिकांची उपस्थिती

Edited by: दिपेश परब
Published on: August 30, 2023 20:15 PM
views 155  views

वेंगुर्ले :  आज ३० ऑगस्टला  नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील नागरिकांबरोबरच येथील पोलिस ठाणे, पत्रकार समिती, विविध संस्था, लोकप्रतिनिधी, व्यापारी यांनी वेंगुर्ले बंदर येथे समुद्राला नारळ अर्पण केला. यावेळी नागरिकांचीही मोठी गर्दी केली पाहायला मिळाली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत वेंगुर्ला बंदर येथे समुद्राला नारळ अर्पण केला. 

दरवर्षी वेंगुर्ला बंदरावर नारळी पौर्णिमा सण बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. यावर्षी सुद्धा नारळी पौर्णिमेला वेंगुर्ला बंदर येथे नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर विविध खाद्यपदार्थांचे स्टोलही यावेळी लावण्यात आले होते. 

या नारळीपौर्णिमे निमित्त तहसीलदार ओंकार ओतारी, वेंगुर्ला प्रांताधिकारी प्रसन्नजीत चव्हाण, पोलिस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक अतुल जाधव, नायब तहसीलदार अभिजात हजारे,  तालुका पत्रकार समितीच्या वतीने माजी अध्यक्ष प्रदीप सावंत, वेंगुर्ल्यातील व्यापारी, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, हायटेक कॉम्प्युटरचे गणेश अंधारी, आंबा बागायतदार नितीन कुबल, माझा वेंगुर्लाचे सदस्य,शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, संघटक सुनील डुबळे, ठाकरे सेनेचे शहरप्रमुख अजित राऊळ यांच्यासाहित विविध संस्था प्रतिनिधी, नागरिक, लोकप्रतिनिधी यांनी नारळाची विधिवत पूजा करून नारळ समुद्राला अर्पण केला.