
दोडामार्ग : गोव्यातून वझरे येथे कोळसा वाहतूक करणारा 10 चाकी ट्रक पलटी होऊन अपघात घडला. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र ट्रकचे किरकोळ नुकसान झाले. वझरे येथील वेंदात कंपनीला गोवा येथून मोठ्या प्रमाणात 10 चाकी ट्रक मधून ओव्हर लोड कोळसा वाहतूक सुरु आहे या वाहतुकीमुळे आयी, माटणे, वझरे आदी गावातील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
गोवा, आयी, ते वझरे असे राञीच्या वेळी अवैध कोळसा वाहतूक करतात या कोळसा ट्रक मुळे यापूर्वी अनेक अपघात झाले. तरी सिंधुदुर्ग वाहतूक पोलीस दोडामार्ग पोलीस या नियमबाह्य कोळसा वाहतूकीला अभय देत आहेत. असा आरोप आयी येथील स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. कोणत्याही प्रकारची कारवाई दंड केला जात नाही. या कोळसा वाहतूक मुळे लोकांना नाहक ञास सहन करावा लागतो. अशा प्रकारे ओव्हर लोड कोळसा वाहतूक करणारा ट्रक मंगळवारी सकाळी आयी येथे वळणावर पलटी झाला. नशीबाने चालक वाचला. या ट्रकने रस्ता कडेला असलेले संरक्षण कठडे देखील तोडले. कंपनीकडून ट्रक काढायला आलेल्या लोकांना स्थानिकांनी विरोध केला.
गोवा राज्यातून महाराष्ट्र हद्दीत शेकडो टन माल ट्रक भरून वाहतूक, तसेच महसूल विभागाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवून अवैध कोळसा वाहतूक करत आहेत. शेकडो ट्रक राञी ते पहाटे गोवा आयी ते वझरे वेदांत कंपनीयेथे बेकायदेशीर ओव्हर लोड कोळसा वाहतूक करत आहेत. यामुळे रस्ते खराब झाले. शिवाय कोळसा वाहतूक मुळे लोकांची झोपमोड होते. अपघात देखील होतात पण प्रशासनाकडून अवैध कोळसा वाहतूक कडे डोळेझाक केली जात आहे.