
सावंतवाडी : राजन तेली यांच्या सुपुत्राच्या स्वागत समारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सावंतवाडी येत असून गोवा आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळावर सायं. ७ वा. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रात्री.८ वा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल होणार आहेत. मोपा येथून ते सावंतवाडी जिमखाना मैदानावर तेली यांच्या सुपुत्राच्या स्वागत समारंभात उपस्थित राहून वधु-वरांना आशीर्वाद देणार आहेत. यावेळी भाजपचे बडे नेते देखील उपस्थित राहणार आहेत.