
सावंतवाडी : माझ्या स्वागतासाठी तुम्ही आलात त्यासाठी खुप आभार. सभापती असताना मी इथे आलो होतो. आता मुख्यमंत्री झाल्यावर मी आलो आहे. आज योगायोग जुळून आला. तुम्हाला भेटून आनंद झाला. देवीचे आशीर्वाद घेता आले. मोदींच व्हिजन विकसित भारताच आहे. ही संधी चांगली आहे. विकास करून घेण्यासाठी ही संधी आहे राज्य सरकारकडून याचा फायदा करून घेत विकास करावा असं आवाहन त्यांनी भाजपचे माजी आमदार राजन तेली व प्रभाकर सावंत यांना केलं. तर सगळ्या सावंतांना भेटून आनंद झाला अशी भावना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,माजी आमदार राजन तेली, भोसले नॉलेज सिटीचे अच्युत सावंत-भोसले, प्रमोद सावंत, सरपंच सोनिया सावंत, पोलिस पाटील तानाजी सावंत, विश्राम सावंत आदी उपस्थित होते.