
वैभववाडी:तालुक्यात सायंकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. शहरात पुन्हा पाणी साचले. पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली. वीज पुरवठाही खंडित झाला.
तालुक्यात सायंकाळी जोरदार पाऊस झाला. वीजांच्या गडगडाटासह ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपून काढले. यामुळे शहरात जुना एसटी स्टँडपरिसर जलमय झाला होता. या भागात गुडघाभर पाणी साचले होते. अनेक वाहने यात अडकली होती. शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला. या पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले. शेतकरी अडचणीत सापडला. पावसामुळे दोन्ही घाटातील वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नव्हता. सर्व वाहतूक सुरळीत सुरू आहे.