युवा सेनेच्या तालुकाप्रमुखपदी क्लेटस फर्नांडिस

Edited by: विनायक गांवस
Published on: October 07, 2025 13:47 PM
views 350  views

सावंतवाडी : युवा सेनेच्या तालुका प्रमुखपदी क्लेटस फर्नांडिस यांची आज निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष हर्षद ढेरे यांच्या माध्यमातून ही निवड करण्यात आली असून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे.

युवासेना तालुकाप्रमुख प्रतीक बांदेकर यांनी राजीनामा दिल्यामुळे गेले दोन महिने हे पद रिक्त होते. त्या ठिकाणी श्री. फर्नांडिस यांना संधी देण्यात आली आहे. फर्नांडिस हे आमदार निलेश राणे व संजू परब यांचे विश्वासू सहकारी असून ग्रामीण भागातही त्यांचे काम आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्ष संघटना व युवक संघटना वाढवण्यासाठी त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.