कासार्डे शाळेतील विद्यार्थ्यांचा स्वच्छतेचा निर्धार !

Edited by: उमेश बुचडे
Published on: December 14, 2023 15:34 PM
views 135  views

कणकवली : माणसाला आपले निरोगी जीवन जगण्यासाठी स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ वातावरण हवे असते. स्वच्छतेमुळे कोणतीही रोगराई पसरत नाही म्हणून स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आज कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सुमारे 1100 विद्यार्थ्यी आणि शिक्षकांनी आपले गाव, शाळा आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची स्वच्छ ठेवण्याचा ठाम निर्धार केला असून स्वच्छते संदर्भात त्यांनी शपथ घेऊन  निर्धार केला आहे.पत्रकार गणेश जेठे यांनी  स्वच्छते विषयी लहानपणापासून विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी आणि  स्वच्छतेचा संदेश घरोघरी जावा म्हणून शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली.

    याप्रसंगी मंडल अधिकारी दिलीप पाटील, तसेच कासार्डे गावचे उपसरपंच गणेश पाताडे , कासार्डे गावचे तलाठी गणेश गोडे कासार्डे शिक्षण संस्थेचे संस्था पदाधिकारी कार्याध्यक्ष संजय पाताडे, संस्था पदाधिकारी रवींद्र पाताडे ,माजी सैनिक व संस्था पदाधिकारी रवींद्र पाताडे , प्रशालेचे प्र. मुख्याध्यापक एन.सी. कुचेकर, प्र. पर्यवेक्षक एस.डी भोसले,पत्रकार मोहन पडवळ, सचिन राणे, गुरुप्रसाद सावंत,निकेत पावसकर, दत्तात्रय मारकड तसेच व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

    उपस्थित मान्यवरांचे शाळेच्यावतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा पत्रकार दत्तात्रय मारकड यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना स्वच्छतचे महत्व विशद करीत मान्यवराची ओळख करून दिली.

   याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पत्रकार गणेश जेठे म्हणाले की, आपल्या घराप्रमाणेच आपला गाव ही स्वच्छ ठेवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. विकसीत भारत होण्यासाठी सर्वांनी मिळून स्वच्छ भारतही करायला हवा असे आवाहन त्यांनी करीत  विद्यार्थ्यांना 'स्वच्छतेची शपथ' दिली. शेवटी प्र.पर्यवेक्षक एस.डी. भोसले यांनी आभार मानून या अभियानाची सांगता केली.