
वेंगुर्ले : स्वच्छ्ता उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग-तुळसकडून पुन्हा एकदा सामाजिक भान जपत सागर किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. यावेळी आरवली येथील वेळागर सागरी किनारा आणि परिसराची श्रमदानातुन स्वच्छ्ता करण्यात आली. नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विविध ठिकाणी स्वच्छ्ता उपक्रम राबविण्यात येत आहेत. मागील महिन्यात सागरतीर्थ किनारा व परिसर, डोंगर परिसर व पर्यटन स्थळ स्वच्छ्ता मोहीम राबवण्यात आली होती. यावेळी वेंगुर्ला आरवली येथील वेळागर सागर किनारा व परिसराची स्वच्छता करण्यात आली.
वेंगुर्ले तुळस येथील वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेने युवक युवतींना स्वच्छता विषयक जाणीव जागृती व्हावी, श्रमाच महत्त्व कळावं या उद्देशाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सागर किनारा स्वच्छता केली. किनारा स्वच्छता करताना पर्यटन क्षेत्रांची शोभा कमी करणाऱ्या, आरोग्यास हानिकारक व पर्यावरणास विघातक अशा स्वरूपातील कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने रबर, थर्माकोल, प्लॅस्टिक, तसेच काच आदी दीर्घकाळ किनाऱ्यावर टिकणाऱ्या कचऱ्याचा समावेश होता. प्रतिष्ठानच्या या कार्याचा आढावा घेत ग्रामपंचायत, स्थानिक ग्रामस्थ, पर्यटक यांनी कौतुक करून पुन्हा सर्वांचे एकदा आभार व्यक्त केले. श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी, सामजिक आरोग्य जपणे ही मूल्ये जपणे या उद्देशाने स्वछता उपक्रम घेण्यात आला. यावेळी बहुसंख्य प्रतिष्ठान कार्यकर्ते आणि युवा वर्ग उपस्थित होता.