
कणकवली : रविवारी सिंधुदुर्गवासियानी एकत्र येत फोंडा घाटात स्वच्छतेचा एल्गार केला. पर्यटन स्थळ चकाचक करण्यात आले. त्याशिवाय घाटातील रस्त्याच्या दुतर्फा असलेला परिसर स्वच्छ करण्यात आला.
रविवारी सकाळी साडेनऊ ते बारा वाजेपर्यंत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, फोंडाघाटच्या सरपंच सौ संजना आग्रे, सार्वजनिक बांधकामच्या उप अभियंता के के प्रभू, पत्रकार गणेश जेठे मंडल अधिकारी दिलीप पाटील, फोंडा घाट कॉलेजचे प्राध्यापक सुरवसे, प्राध्यापक जगदीश राणे प्राध्यापक ताडेराव प्राध्यापक रायबोले, सह्याद्री जीवरक्षक संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील, भैया कदम सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल पवार अशोक चव्हाण शैलेंद्र कांबळे शर्मिला पराडकर आनंद तळवडेकर नितीन साटम शिवसेना महिला तालुकाध्यक्ष प्रिया टेमकर, ग्राम विकास अधिकारी विलास कोलते ग्रामपंचायत सदस्य धुरी,पत्रकार मोहन पडवळ संजय सावंत, तुषार नेवरेकर, सचिन राणे, गुरु सावंत, अनिल मेस्त्री, अनिल कामतेकर, सुरेंद्र जळगावकर जितेंद्र सावंत ज्ञानदेव बांदकर दीपक इस्वलकर ,निलेश मेस्त्री,सत्यवान साटम, विजय जामदार, विश्वनाथ जाधव सिद्धेश मोडकर स्वच्छतेचा ब्रँड अँबेसिडर रोहित मोंडकर प्रियंका मोंडकर कोमल जोईल कस्तुरी तीरोडकर मैत्री दुखंडे यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबवण्यात आली.