
मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मंडणगड यांनी केलेल्या आवाहनानुसार ‘‘एस. टी बस स्थानक सखोल स्वच्छता मोहीम’’ राबविण्यात आली. यावेळी एस. टी. आगार स्थानकातील कर्मचा-यांच्या सहकार्याने संपूर्ण बस स्थानक परिसर स्वच्छता करण्यात आली. यावेळी उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, कार्यक्रमाधिकारी डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. विष्णु जायभाये, प्रा. शरिफ काझी, एस.टी. आगारातील कर्मचारी रामेश्वर कदम, सतीश शिंदे, राकेश पाटील, पी. बी. पाटकर, पी. पी. सुतार, विलास विटकर, व्ही.के. चैधरी, जी. के. भटलवार, भिमसेन लोखंडे, सागर विचारे, पत्रकार भरत सरफरे, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला कार्यक्रमाधिकारी डॉ. महेश कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकात वर्षभर अनेक समाजोपयोगी उपक्रम राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत राबविले जातात. स्वच्छता, मतदार जनजागृती, रक्तदान शिबीर, स्त्रीभ्रूण हत्या, कन्या बचाव, इंधन बचाव, आपत्ती व्यवस्थापन, एड्स जनजागृती यासारखे उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. विद्यार्थ्याना श्रमप्रतिश्ठेचे महत्त्व यातून सांगितले जाते. त्याचाच एक भाग म्हणून ही स्वच्छता मोहिम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. सदर स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव, आगार व्यवस्थापक श्री. एम. बी. जुनेदी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाधिकारी डॉ.महेश कुलकर्णी, डॉ. विष्णु जायभाये व स्वयंसेवक-स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.