सिंधुदुर्गनगरीतील स्मशान भूमीत स्वच्छता मोहिम !

संविता आश्रमाचे संदीप परब यांनी स्वच्छता राबवून साजरा केला वाढदिवस
Edited by: देवयानी वरसकर
Published on: February 01, 2024 12:25 PM
views 157  views

सिंधुदुर्गनगरी :  निराधांना आधार देणाऱ्या पणदूर येथील संविता आश्रमाचे विश्वस्त संदीप परब यांनी आपला वाढदिवस साजरा करतानाही समाजिक बांधिलकी जपत सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण येथील स्मशान भूमीत स्वच्छता मोहीम राबविली व आगळा वेगळा उपक्रम राबविला.
 
    रस्त्यावर बेवारस फिरणारे असतील ,कुणी मनोरुग्ण व्यक्ती फिरणारी असेल, कुणी निराधार असेल अशा व्यक्तींना आधार देऊन त्याचे पुनर्वसन करण्याचे सेवाभावी काम पणदूर येथील संविता आश्रमाचे विश्वस्त संदीप परब करत असतात त्यांनी आपल्या सेवाभावी वृत्ती प्रमाणे आपला ५१ वा वाढदिवस स्वच्छता मोहीम राबवून साजरा करण्यात आला.

    सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण येथील स्मशान भूमी मध्ये गुरुवारी स्वतः सक्रिय सहभाग घेत स्वच्छता अभियान राबविले. यावेळी पत्रकार संदीप गावडे, संविता आश्रमाचे कर्मचारी, आश्रमातील निराधार व्यक्ती, तसेंच छत्रपती कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला. यावेळी स्मशान भूमितच केक कापण्यात आला. 

    दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी या स्मशान भूमी विकसित करण्याची संधी दिल्यास याठिकाणी वृक्ष लागवड व बाग बगीचा निर्माण करून एक स्वच्छ सुंदर व सर्व सोयीनियुक्त  स्मशान भूमी निर्माण करू असे संदीप परब यांनी सांगितले.