
दोडामार्ग : सरस्वती विद्यामंदिर कुडासे या प्रशालेमध्ये 'एक तारीख एक तास श्रमदान' हा उपक्रम रविवारी राबविण्यात आला. या प्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी मिळून शालेय परिसर स्वच्छ करून या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.
यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका परब, जेष्ठ शिक्षक देसाई, सांस्कृतिक विभाग प्रमुख शेंडगे, डेगवेकर,बांदेकर उपस्थित होते.'एक तारीख एक तास श्रमदान'हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. शालेय शिक्षण विभागाने केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानात सर्व शाळांनी सहभाग नोंदविण्याचे निर्देश दीले आहेत. 15 सप्टेंबर 2023 ते 02 ऑक्टोबर या कालावधीमध्ये संपूर्ण देशामध्ये स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी कुडासे प्रशालेत हे स्वच्छता अभियान राबिण्यात आले.