
देवगड : स्वच्छता ही सेवा अंतर्गत पर्यटनस्थळी स्वच्छता अभियान मोहिम तळवडे गावातील प्रसिद्ध धबधबा न्हावळकोंड येथे गटविकास अधिकारी श्री . जयप्रकाश परब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली . यावेळी तळवडे गावातील प्रभारी सरपंच श्रीम . मानसी माणगांकर, मा .सरपंच पंकज दुखंडे , ग्रा .प सदस्य श्री . गणेश लाड , ग्रा.प सदस्य गोपाळ रूमडे , ग्रा.प .सदस्य श्रीम . सुजाता घाडी , पोलीस पाटील अनिल लाड , आरोग्य विस्तार अधिकारी श्रीम . प्रतिमा वळंजु ,ग्रामसेवक श्री . वारंग , गटसमन्वयक श्रीम . वैशाली मेस्त्री , पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर, अंगणवाडी सेविका श्रीम. शोभा कुबडे, ललिता दुखंडे, सुनीता मुणगेकर व ग्रामपंचायत कर्मचारी किशोर तळवडेकर, मकरंद घुले, प्राजक्ता भाटकर, रचना धुरी व मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी न्हावळकोंड धबधब्यात पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध व्हावात याबाबत गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी सरपंच व ग्रामस्थांची चर्चा केली . तळवडे न्हावळकोंड धबधबा प्रवाहित झाल्यापासुन या धबधब्याकडे पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे .विशेषता जिल्हातील व जिल्हाबाहेरील पर्यटकही मोठ्या संख्येने येत असुन चतुर्थीच्या या कालावधीतही मुंबईतील पर्यटकांनीही या धबधब्याला सर्वाधिक पंसती दिली.