
मंडणगड : क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयाचे शंभर दिवसांचे कृती आराखड्याचे अंर्तगत मंडणगड तहसीलदार कार्यालय मंडणगड यांच्यावतीने किल्ले मंडणगड येथे नगपंचायत मंडणगड यांच्या सहकार्याने 13 मार्च 2025 रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये संपूर्ण किल्ला परिसराची स्वच्छता करून जमा केलेल्या गोळा केलेल्या कचरा विल्हेवाट लावण्यासाठी नगरपंचायत मंडणगड यांचे ताब्यात देण्यात आला.
स्वच्छता मोहीमेत तहसिलदार अक्षय ढाकणे, निवासी नायब तहसिलदार संजय गुरव, महसुल नायब तहसिलदार श्री. खानविलकर, मंडळ अधिकारी श्री. साळवी, श्री.शिगवण, श्री. गायकवाड, निलेश गोडघासे, सुरज गायकवाड यांच्यासह तहसिल कार्यालयातील 32 महसूल अधिकारी, कर्मचारी व मंडणगड नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.