
कणकवली : कणकवली तालुक्यातील करूळ येथे ग्रामपंचायतच्या पुढाकाराने गावातील कर्मचारी, ग्रामस्थ आणि शाळकरी मुलांनी स्वच्छता मोहीम राबवली. कणकवलीचे तहसीलदार आर जे पवार यांनी या मोहिमेत सहभागी होत ग्रामपंचायत सरपंच समृद्धी नर व गावातील ग्रामस्थांना प्रेरणा दिली.
सरपंच समृद्धी नर यांनी या स्वच्छता मोहिमेसाठी पुढाकार घेतला. उपसरपंच पुरुषोत्तम तानावडे ग्रामपंचायत सदस्य शिवराम शिंदे, परेश कुडतरकर,रिया ढवन, वृषाली चव्हाण, रेश्मा चव्हाण यांनी या मोहिमेत हिरीरेने सहभाग घेतला होता. या मोहिमेचा शुभारंभ कणकवली तालुक्याचे तहसीलदार आर जे पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी पत्रकार गणेश जेठे मंडल अधिकारी दिलीप पाटील माजी सरपंच बबन कर्णिक तलाठी मारुती सलाम, आरोग्य सेविका कल्पना ठाकरे, ग्रामपंचायत कर्मचारी निकिता हुले, गोपाळ मेस्त्री हुंबरट सरपंच मनीषा गुरव हुंबरट ग्रामपंचायत सदस्य मंदा दळवी, पशुधन पर्यवेक्षक दीपक चव्हाण, रेशनिंग दुकान चालक संघटनेचे अध्यक्ष सुदर्शन फोपे, मुख्याध्यापक विनिता पाटील शिक्षिका रश्मी राणे शिक्षक श्री चोबे संतोष कर्णिक, अंगणवाडी सेविका हर्षदा सरवणकर, अंकिता तेली पोलीस पाटील गणेश जाधव,हायस्कूलचे शिक्षक विनोद मेस्त्री, कर्मचारी सहदेव जाधव, आशा स्वयंसेविका संपदा कुडतरकर, राधाबाई तेली, अश्विनी नर व ग्रामस्थ,शाळकरी मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. करूळ चव्हाटा येथे या स्वच्छता मोहिमेला शुभारंभ झाला.
सुरुवातीला राष्ट्रगीत गाऊन स्वच्छतेची प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी तहसीलदार आर जे पवार यांनी सांगितले की स्वच्छतेमुळे रोगराई दूर राहते, त्याशिवाय माणसांची मनेही स्वच्छ राहतात. जे गाव स्वच्छ आहे असे गाव सुद्धा गुण्यागोविंदाने नांदते असे म्हटले जाते. करूळ गाव नेहमीच स्वच्छ आणि प्रगतीपथावर राहिले आहे. करुळ गावातील ग्रामपंचायत सरपंच समृद्धी नर आणि त्यांच्या सह काऱ्यांनी स्वच्छता मोहीम हातात घेतली त्याबद्दल त्यांचा गौरव केला पाहिजे. गावातील ग्रामस्थांनी पूर्ण गाव स्वच्छ होईपर्यंत त्यांना सहकार्य केले पाहिजे असे आवाहन केले . यावेळी सरपंच समृद्धी नर यांनी ही मोहीम राबवताना खूप आनंद होत आहे, हळूहळू संपूर्ण गावामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. पूर्ण गाव स्वच्छ करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत ,असे सांगून तहसीलदार व इतर सर्व अधिकारी कर्मचारी शिक्षक शाळकरी मुले आणि ग्रामस्थ यांनी या मोहिमेत सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचे आभार मानले. पत्रकार गणेश जेठे यांनी मनोगत केले.माजी सरपंच बबन कर्णिक यांनी या मोहिमेला शुभेच्छा दिल्या तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. .यावेळी प्रास्ताविक व आभार ग्रामसेविका नयना मिठबावकर यांनी मानले. ग्रामपंचायत कार्यालय परिसर ते करूळ हायस्कूल समोरचा परिसर स्वच्छ करून हुतात्मा भास्कर कर्णिक यांच्या स्मारकाजवळ मोहिमेची समाप्ती करण्यात आली.