सुरक्षितता म्हणून नागरिकांनी मास्क वापरावा : जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

कोविडबाबत पूर्वतयारी आणि सतर्कतेसाठी झालेल्या आढावा बैठकीत सूचना
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 26, 2022 16:42 PM
views 299  views

सिंधुदुर्गनगरी : आपली आणि इतरांची सुरक्षितता म्हणून नागरिकांनी मास्कचा आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले. कोविडबाबत पूर्वतयारी आणि सतर्कता म्हणून आज आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, एकही रुग्ण नसल्याने सध्या जिल्ह्यात कोणतीही घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. परंतु, सतर्कता आणि पूर्वतयारी असावी म्हणून सर्व यंत्रणांनी विशेषत: आरोग्य यंत्रणेने काळजी घ्यावी. यंत्रसामग्री, साधनसामग्री, ऑक्सीजन प्लॅंट, औषधे, सीसीसी, डी.सी.एच, डी.सी एच.सी, बेड याबाबत सतर्क रहावे. तालुकास्तरावरील यंत्रणांनीही सतर्कता म्हणून सर्व विभागाची बैठक घेवून सावधानता बाळगावी अवश्यक सुविधा तयार ठेवाव्यात.

पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रजित नायर यांनीही मास्क आणि सॅनिटायझर वापराबाब आवाहन केले. बैठकीला अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, प्रशांत पानवेकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिफे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा प्रशासन अधिकारी अवधूत तावडे आदी उपस्थित होते.