
कणकवली : अँथनी चर्च फणसवाडी कणकवली यांच्यावतीने पटकीदेवी ते कणकवली पोलीस स्थानकपर्यंत ख्रिसमसनिमित्त सोमवारी सायंकाळी रॅली काढली. यामध्ये सांताक्लॉज तसेच बच्चे कंपनीने येशू जन्माचा देशावा सादर केला होता. यामध्ये पॅरिस गिफ्ट फादर तसेच ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते.
पटवर्धन चौकात येशू जन्माबाबतची माहिती नागरिकांना देण्यात आली. दरम्यान, कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी या रॅलीचे स्वागत केले. कणकवली पोलीस ठाणा परिसरात या रॅलीची सांगता झाली.










