पुढच्यावर्षी पणदूर येथे ‘चित्रांगी गंधर्व उध्दार’ !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 30, 2023 16:03 PM
views 69  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटना पणदूर तिठाच्या वतीने सोमवार 1 जानेवारी 2024 रोजी पणदूर तिठा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी 8 वा श्री सत्यनारायण महापूजा, 10 वा. श्रींची आरती व तिर्थप्रसाद, दुपारी 12.30 वा. ते 3 वा. महाप्रसाद, दुपारी 1 वा. पासून ग्रामस्थांची सुश्राव्य भजने, सायंकाळी 7 वा. नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भुमीका दशावतार नाट्यमंडळ, मळगाव यांचा ‘चित्रांगी गंधर्व उध्दार’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन रिक्षा चालक-मालक संघटना,पणदूर तिठा यांच्यावतीने करण्यात आले आहे.