लाकडी खेळण्यांचे व्यापारी सुभाष चितारींच अल्पशा आजाराने निधन

Edited by: विनायक गांवस
Published on: May 27, 2023 13:41 PM
views 324  views

सावंतवाडी : सावंतवाडी चितार आळी येथील सर्वांत पहिले व सुप्रसिध्द लाकडी खेळण्यांचे व्यापारी सुभाष चितारी (वय.७८) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. आज पहाटे ४ वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. सावंतवाडी राजघराण्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. लाकडी खेळण्यांची कला सावंतवाडीत जपण्यात व रूजविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. सुरुवातीच्या काळात मुंबई येथे कामाला असताना समाजवादी विचारांच्या नेत्यांशी त्यांचे निकटचे संबंध होते. संयुक्त महाराष्ट्रासह अनेक लढ्यात देखील त्यांचा सहभाग होता. आज सकाळी त्यांना देवाज्ञा झाली. राघवेंद्र चितारी यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, २ भाऊ, २ मुलगे, १ मुलगी पुतणे, असा मोठा परिवार आहे. उपरलकर स्मशानभूमीत दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.