चिराग चितारीची गणित - अंकगणित स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावर निवड

Edited by: विनायक गांवस
Published on: August 02, 2024 12:31 PM
views 336  views

सावंतवाडी : एड्युस्मार्ट इंक सावंतवाडी अबॅकस सेंटर मधील चिराग पूजा राजेश चितारी याची हाँगकाँग येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय गणित आणि मानसिक अंकगणित स्पर्धेसाठी (आय. ए. एम ए.) २०२४ द्वारा राष्ट्रीय स्तरावर निवड झालीी आहे

ही स्पर्धा हाँगकाँगमध्ये ४ ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्थेसाठी भारताकडून एकुण चार मुलांची निवड झाली असून जगभरातून विविध देशातील २००० मुले या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह‌यासाठी तसेच सावंतवाडी शहरासाठी ही अभिमानाची बाब आहे. चिराग याने अबॅकस या अंकगणित विषयाचे प्रशिक्षण सावंतवाडीतील एड्युस्मार्ट अॅक्टीव्हीटी सेंटरच्या संचालिका सपना नितेश पिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आहे. एड्युस्मार्ट अॅक्टीहीटी सेंटर २०१८ पासून सावंतवाडी भटवाडी येथे कार्यरत आहे. श चिरागच्या या कामगिरीचे सर्व स्तरातू‌न अभिनंदन होत आहे.