
चिपळूण : चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनतर्फे महाराष्ट्रातील “सर्वोत्कृष्ट बँक” हा मानाचा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थाचे अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर व व्यवस्थापक श्री. संदीप रहाटे यांनी बँकेचे संचालक मंडळ व कर्मचारीवर्गाचे अभिनंदन करून त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल, उपाध्यक्ष रहिमान दलवाई, साईओ तुषार सूर्यवंशी, चीफ ऑफिसर नितीन चिंगळे, अरविंद भागडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.